South Movie : जबरदस्त बॉलीवूड अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन मानुषी छिल्लर ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ या अॅक्शन-पॅक थ्रिलरमधून तेलगू चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.मानुषी वरुण तेजसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. टॉलीवूडमध्ये तिच्या प्रवेशाची चाहत्यांनी आतुरतेने वाट पाहत असताना, मानुषीने इंस्टाग्रामवर इंग्रजी, हिंदी आणि तेलुगूमध्ये चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. पोस्टर खूपच अप्रतिम आहे.
View this post on Instagram
पोस्टर शेअर करताना मानुषी छिल्लरने कॅप्शन दिले, ‘प्रिपेयर फ़ॉर द अल्टीमेट शोडाउन- द बैटल हैज जस्ट बिगन’ ऑपरेशन व्हॅलेंटाईनसाठी सज्ज व्हा. 8 डिसेंबर 2023 पासून हिंदी आणि तेलगू चित्रपटगृहांमध्ये. असं लिहत तिने या चित्रपटाबाबत माहिती दिली आहे,
मानुषी छिल्लरचा नवीन चित्रपट
मानुषी छिल्लर भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासून लोकांची आवडती बनली. तिचा नुकताच आलेला ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ हा चित्रपट प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनाही आवडला होता पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. मानुषीने तिच्या अभिनयासोबतच स्वतःला फॅशन आयकॉन बनवले आहे. नुकतीच तिने लंडन फॅशन वीकमध्ये भाग घेतला होता.
सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शननेही त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर चित्रपटाची रिलीज डेट शेअर केली आहे. पोस्टमध्ये लिहिले होते, ‘ऑपरेशन वैलेंटाइन: स्काई हाई रिवील…’ या चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शन आणि रेनेसान्स पिक्चर्सचे संदीप मुड्डा यांनी केली आहे, तर नंदकुमार अबिनेनी आणि गॉड ब्लेस एंटरटेनमेंट यांची सहनिर्मिती आहे.