मुंबई – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) मालिका मागील अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करत आहे. या मालिकेमध्ये दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीची (Disha Vakani) एक झलक पाहायला मिळाली आहे. या मालिकेत बऱ्याच काळापासून दिशा काम करत नसल्याने चाहते नाराज आहेत. अनेकजण ती पुन्हा या मालिकेत येण्याची प्रतिक्षा करत आहे. दयाबेन या पात्राला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अद्याप या मालिकेतील दिशाची जागा कोणत्याही अभिनेत्रीला घेता आलेले नाही.
अनेक वर्षानंतर दिशा वकानीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ती तिच्या चिमुकल्या मुलासोबत पाहायला मिळाली. एका इव्हेंटमध्ये ती उपस्थित राहिली होती. यावेळी तिने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. दिशा पती आणि मुलासोबत नवरात्री सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती. लग्नानंतर 5 वर्षांनी तिची पहिल्यांदाच झलक पाहायला मिळाल्याने चाहते देखील खूश झाले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, 2017 पासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शोमधून दिशा वकानी गायब झाली आहे. सप्टेंबर 2017 मध्ये तिने प्रसूती रजा घेतली. चाहते तिला मालिकेत पुन्हा पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. दयाबेन ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये लवकरच कमबॅक करणार असल्याच्या चर्चा देखील मध्यंतरी खुप रंगल्या होत्या. परंतु तिने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आहे. सध्या दिशा आपल्या कुटुंबाला अधिक वेळ देणं पसंत करत आहे.