रांची : झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे. भाजपाला धुळ चारत त्यांनी कॉंग्रेससह आघाडी करून त्यांनी झारखमडमध्ये सत्ता हस्तगत केली आहे. सोरेन शूक्रवारी शपथ घेणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
झामुमोची नेता निवडीची बैठक मंगळवारी होणार आहे. अशीच बैठक कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलही घेणार आहे. झामुमोची बैठक पक्षाध्यक्ष शिबु सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली होईल. त्यात विधीमंडळ पक्षनेतेपदी हेमंत सोरेन यांची निवड होण्याची शक्यता आहे. हेमंत सोरेन हे राज्यपालांना भेटून त्यानंतर सरकार स्थापनेचा दावा करतील.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत सोरेन हे शुक्रवारी (दि. 27) शपथविधी घेतील. खाणीच्या या राज्याचे ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनतील.
भाजपेतर राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांना या शपथविधीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात येणार आहे. कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहूल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. हे निमंत्रण देण्यासाठी सोरेन हे स्वत: दिल्लीला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.