पेठ : शेतीशाळा शेताच्या बांधावर कृषी अधिकारी जाऊन शेती शाळा अंतर्गत महाराष्ट्र शासन विभाग यांचे मार्फत क्राँपसँप अंतर्गत ज्वारी पिकांची शेतीशाळा घेण्यात आली. त्यामध्ये मंडळ कृषि अधिकारी मंचर प्रमिला मडके यांनी किड अशी माहिती नियत्रंणासाठी पक्षी थांबे तसेच फोरेमन सापळे हरभरा पिकांमध्ये लावण्याचे फायदे सांगितले.
ज्ञानशक्ती वाहिनी अंतर्गत महिला सबलीकरण विषयी यावेळी माहिती देण्यात आली.मंडल कृषी अधिकारी प्रमिला मडके यांनी सांगितले की मुलगी डॉक्टर, इंजिनिअर करण्यापेक्षा झाशीच्या राणीसारखे जेणेकरून स्वतः चे संरक्षण ती स्वतः करू शकेल.असे तीचे व्यक्तिमत्व तयार झाले पाहिजे त्यासाठी मुलामुलींमध्ये भेदभाव करु नका.
अनिता चौधरी ,आशा गटे,वैशाली माळुंजे,कुषीमित्र रवींद्र तोत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी पंचायत समिती सदस्य जितेंद्र माळुंजे यांनी कुषीविषयक समाधानकारक काम होत आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र तोत्रे यांनी केले व अनिता चौधरी यांनी आभार व्यक्त केले.