मुंबई – कोरोनाच्या काळात लोकांसाठी मसिहा म्हणून उदयास आलेला सोनू सूद आजही लाखो लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे. मदतीसाठी अभिनेत्याच्या घरी लोक लांबच लांब रांगा लावतात. गरजू नेहमीच त्याला मदत मागत असतात आता सोनू विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम उपक्रम सुरू करणार आहे.
दरम्यान, सोनू सूद आयएएस परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंगची सुविधा सुरू करणार आहे. अभिनेत्याने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. सोनूने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, चला मिळून एक नवा भारत बनवूया. 22-23 रोजी संभवमचा शुभारंभ. IAS परीक्षेसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग. त्याचवेळी त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, तुम्हाला आयएएसची तयारी करायची आहे तर, आम्ही तुमची जबाबदारी घेऊ.
ट्विटद्वारे सोनूने सांगितले की, सोनू सूद चॅरिटी फाऊंडेशनने दिया दिल्लीच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला आहे. जे गरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांना नागरी सेवा परीक्षेची तयार करण्यास मदत करेल.
याप्रमाणे अर्ज करा
या मोफत कोचिंगचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना फाऊंडेशनच्या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागेल आणि नोंदणीसाठी फाऊंडेशनकडून निश्चित शुल्कही भरावे लागणार आहे. त्यानंतर अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना देशातील सर्वोच्च नागरी सेवा संस्थांमध्ये मोफत ऑनलाइन IAS प्रशिक्षण दिले जाईल. यासोबतच फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे.