मुंबई : बाॅलीवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. नुकतेच अभिनेत्री कटरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशलचा ग्रॅंड विवाह पार पडला. त्यानंतर आता दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले आहे. चाहत्याकडून सोनाक्षीला लग्नाबाबत सातत्याने प्रश्न विचारले जात आहे.
याच सगळ्या चर्चेला पुर्णविराल देण्यासाठी नुकताच सोनाक्षी सिन्हाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘आस्क मी एनिथिंग’ हा सेशन ठेवला होता. यादरम्यान चाहत्यांनी अभिनेत्रीला पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल अनेक हटके प्रश्न विचारले. सोनाक्षी सिन्हानेसुद्धा सर्वच प्रश्नांची उत्तरे आपल्या अतरंगी अंदाजात दिली आहेत. अभिनेत्रीने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये या या प्रश्न उत्तरांचे स्क्रीन शॉट्स शेअर केले आहेत.
यावेळी चाहत्याने प्रश्न करत विचारलं, ‘मॅडम सर्वांची लग्न होत आहेत. तुम्ही कधी लग्न करणार?’ यावर उत्तर देत सोनाक्षीने आपला एक हसणारा बुमरँग शेअर केला आहे. सोबतच अभिनेत्रीने लिहिलं आहे, ‘सध्या सर्वांनाच कोरोना होत आहे. मलासुद्धा कोरोना व्हायला हवा का?” अभिनेत्रीने या प्रश्नाला मजेमध्ये घेतलं. तसेच आपल्या हटके उत्तराने चाहत्यांचा मनसुद्धा जिंकलं आहे.