म्हासुर्णे – शेनवडी गावचे अनेक प्रश्न मार्गी लावले असून पुसेसावळी भागातही अनेक विकासकामे केली असल्याने आता खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती व मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वानी काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी केले.
शेनवडी (ता.खटाव) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी आ. बाळासाहेब पाटील बोलत होते.
यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप विधाते, राष्ट्रवादी कांग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पवार, प्रा.बंडा गोडसे, संदीप मांडवे, सी. एम. पाटील, जितेंद्र भोसले, सुरेश पाटील, संतोष घार्गे, अनिल माने, विलास शिंदे,संभाजी थोरात, भाऊसो लादे, श्रीरंग पिसाळ, अरुण दबडे, भीमराव घोडके, दादासो कदम, महादेव माने, बापूसो माने, बापूराव पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्केट कमिटीचे माजी सभापती सी. एम. पाटील म्हणाले, “”शेनवडी गावामध्ये माळी मळ्यात बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृह, बाजार चौकामध्ये बाजारतळ, शेनवडी- भूषणगड रस्ता, शेनवडी- म्हासुर्णे रस्ता, शेनवडी- चोराडे रस्ता, शेनवडी- रहाटणी रस्ता, शेनवडी- होळीचा गाव रस्ता या कामांचे उदघाटन, चव्हाण मळा रस्ता भूमिपूजन, मुस्लिम समाज सभागृहाचे उदघाटनासह अनेक कामे मार्गी लागली आहेत. पुसेसावळी जिल्हा परिषद गटामध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे आमदार पाटील यांच्यामुळे मार्गी लागली आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळातील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मागे खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे.”
कार्यक्रमास सरपंच ज्ञानेश्वर पाटील, उपसरपंच बबन माळी, सागर पाटील, सुभाष कोकाटे, बबन घोडके, करीम मुलाणी, लक्ष्मण चव्हाण, पोपट कुंभार, पंढरीनाथ कोकाटे, शिवाजी रसाळ, जालिंदर तांबोळी, आकाश पाटील, शंकरराव खापे, विठ्ठल डांगरे, विलास पिसाळ, चंद्रकांत माने, गणपत डांगरे, अभिमन्यू गंधाले, शरद देसाई, इस्माईल पटेल, अरविंद मगर, नेताजी सरनोबत, लहू जाधव,सुनील जानकर, सुनील पिसाळ, जयवंत सरनोबत, शहाजी देसाई, शाखा अभियंता एस. व्ही. पवार, शाखा अभियंता कुलकर्णी आदीसह या कार्यक्रमास पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.