नवी दिल्ली – गाझापट्टीतील हमास आणि इस्त्रायल यांच्यात गेल्या 9 दिवसांपासून तुंबळ युध्द सुरू आहे. गाझातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी इस्त्रायलने (israel) मुदत दिली आहे. दरम्यान, या संघर्षाचे जगभर पडसाद उमटत असून काही जणांचा व देशांचा इस्त्रायलला पाठिंबा आहे, तर काही देश पॅलेस्टीनच्या (Palestine) बाजूने उभे असल्याचे दिसून येत आहे. अशीच पॅलेस्टीनची बाजू घेत त्या देशासाठी वर्गणी गोळा करणे उत्तर प्रदेशातील एका कॉन्स्टेबलला चांगलेच महागात पडले असून त्याला निलंबित करण्यात आले आहे.
सुहेल अन्सारी (Suhel ansari) हे त्याचे नाव असून तो लखीमपूर खीरी येथे कार्यरत होता. गेल्या दोन तीन दिवसांपासून तो पॅलेस्टीच्या समर्थनार्थ पोस्ट टाकत होता आणि त्याकरता म्हणजे पॅलेस्टीनींना मदत म्हणून पैसे देण्याचे आवाहन करत होता, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक संदीप सिंह यांनी दिली.
अन्सारी यांनी केलेल्या पोस्टची दखल घेत चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.पोलीस खात्यासह संपूर्ण उत्तर प्रदेशात या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
सोशल मीडियावर पोस्ट (Social media post) करणं कॉन्स्टेबलला चांगलचं महागात पडलं आहे.संबंधित कॉन्स्टेबल कोणत्या संघटनेशी अथवा त्याच्या अन्य आक्षेपार्ह बाबींची कोणती माहिती समोर आलेली नाही. मात्र त्याच्या संदर्भात काही तक्रारी आल्या होत्या असे संदीप सिंह यांनी सांगितले.