राजगुरूनगर – झटपट निर्णय दिल्याने वकील बांधव नाराज व व्यथित झाले असून त्यांनी केलेले आरोप मोघम आहेत. वकिलांबद्दल कोणतीही द्वेष भावना नाही अशी प्रांत अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी प्रतिक्रिया दिली.
खेड वकील बार असोसिएशनने पत्रकार परिषद घेऊन खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यावर भ्रष्टाचाराबाबत व वकील पक्षकार यांना चांगली वागणूक देत नसल्याबाबत गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. याबाबत प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी प्रतिक्रिया दिली.
प्रांत अधिकारी कट्यारे म्हणाले, शासनाने जे काम दिले आहे ते मी स्वतः प्रामाणिकपणे करीत आहेत.दुसरी महत्वाची गोष्ट आहे वागणूक त्यांना चांगली मिळत नाही, आर्थिक आणि अजून काही आरोप आहेत. त्यापेक्षा वकील माझ्याकडे येऊन गेले होते मी जे निर्णय पटापट देत आहेत पटापट निर्णय देत असल्याने वकील व्यथित झाले आहेत.
वकील वारंवार गैरहजर राहत आहेत त्यानंतर त्यांच्या केसेस कायदेशीररित्या काढून टाकल्या आहेत. परंतु ही कायदेशीर बाब त्यांना पटलावर घेता येत नसल्यामुळे त्यांनी मोघम आरोप केले आहेत मला वकिलांबद्दल कुठल्याही प्रकारची द्वेष भावना नाही.असायचे कारणही नाही. कारण मी न्यायाधीश या पदावर काम करतो मला त्या चौकटीत राहूनच काम करायचे आहे.
राजगुरुनगर: झटपट निर्णय दिल्याने वकील बांधव नाराज, त्यांनी केलेले आरोप मोघम – प्रांत अधिकारी जोगेंद्र कट्यारे pic.twitter.com/VLzdhD3fDy
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 17, 2023