सोलारीस राष्ट्रीय टेनिस स्पर्धा (पुणे) – सोलारीस क्लब तर्फे आयोजित दहाव्या ‘सोलारीस करंडक’ जीएसटीए वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय टेनिस २०२४ स्पर्धेत पुण्याच्या मंदार वाकणकर, नीरज आनंद, अमित लाटे, नितीन किर्तने, अजय कामत यांच्यासह मुंबईच्या भूषण अकूट, अजित पेंढारकर आणि किशोर सबनानी यांनी अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉ मध्ये ३५ वर्षावरील गटात पुण्याच्या मंदार वाकणकर याने पुण्याचाच जॉय बॅनर्जी याचा ९-३ असा पराभव केला.
पुण्याचा आणि चौथा मानांकित नीरज आनंद याने कर्नाटकच्या आणि अग्रमानांकित जयेश सोळंकी याचा ९-५ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. ४५ वर्षावरील गटामध्ये पुण्याच्या अमित लाटे याने शहर-सहकारी सुनिल लुल्ला याचा ९-८ (७-१) असा टायब्रेकमध्ये पराभव केला. पुण्याचा आणि राष्ट्रीय खेळाडू नितीन किर्तने याला पुढे चाल मिळाली. ५५ वर्षाखालील गटामध्ये पुण्याच्या आणि अग्रमानांकित अजय कामत याने यवतच्या शिरीष नांदूरडीकर याचा ९-५ असा पराभव केला.
Solaris Cup National Tennis Tournament : डॉ. अजित पेंढारकर उपांत्यपूर्व फेरीत…
मुंबईच्या भूषण अकूट याने पुण्याच्या रणजीत चव्हाण याचा ९-२ असा सहज पराभव केला. ७० वर्षावरील गटामध्ये चौथ्या मानांकित आणि मुंबईच्या अजित पेंढारकर याने पुण्याचा शाम गायकवाड याचा ९-५ असा सहज पराभव केला. मुंबईच्या किशोर सबनानी यांनी पाचव्या मानांकित आणि गुजरातच्या महेंद्र कक्कड यांचा ९-४ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.