औंरंगाबाद – ईएमएमटीसी आयोजित व एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत दुस-या फेरीत मुले व मुलींच्या गटात मानाकित खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
दुस-या फेरीत मुलांच्या गटात पुण्याच्या पाचव्या मानांकीत अर्णव पापरकरने ऋषी नंदीपतीचा 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
अव्वल मानांकीत संप्रित शर्माने कांज शहाचा 6-3, 6-1 असा, सहाव्या मानांकीत तनुष घिलदयालने प्रणव चिरुममिल्ला 7-5, 6-2 असा तर चौथ्या मानांकीत मार्क्स डार्विनने ओजस मेहलावतचा 7-5, 6-4 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
रुरिक रजनीने शौनक चॅटर्जीचा 6-0, 6-1 असा तर अंशित देशपांडेने विश्वजीत सणसचा 6-4, 6-4 असा पराभव केला. आकृती सोनकुसरेने वंशिका वैजचा 6-4, 7-5 असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.