पुणे – सुजल लखारी, निनाद कुलकर्णी, ऋषभ देशपांडे यांनी पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे.
या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या तिस-या फेरीत सुजल लखारीने मानस रत्नपारखीवर २१-७, २१-८ अशी, तर निनाद कुलकर्णीने प्रणव वाघवर २१-१६, २१-१२ अशी मात केली. यानंतर ऋषभ देशपांडेने पार्थ देशपांडेचे आव्हान २१-९, २१-७ असे सहज परतवून लावले.
Amanora PYC-HTBA Cup (Badminton) : अन्वीत, कबीरसह गौतमची आगेकूच…
या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या तिसऱ्या फेरीत कवीन पटेलने चिन्मय फणसेचे आव्हान २१-१२, १५-२१, २१-११ असे परतवून लावले. यानंतर देवांश सकपाळने नील गोएलवर २१-७, २१-१० असे, तर रघुवेंद्र यादवने नंदन मुथावर २२-२०, २१-१३ असा विजय मिळवला. १५ वर्षाखालील मुलांच्या एकेरीच्या तिसऱ्या फेरीत अभिग्यान सिन्हा याने रियांश चौधरीवर २१-१४, २१-९ असा विजय मिळवला.