पणजी – “भारतात आशयसंपन्न साहित्य आणि तंत्रज्ञानाचे जगातील सर्वात मोठे भांडार असून, इफ्फी (Iffi) सारखा महोत्सव उर्वरित जगाला भारताची संस्कृती जाणून घ्यायला मदत करतो,” असे इफ्फीचे प्रमुख ज्युरी शेखर कपूर (Shekhar kapoor) म्हणाले.सृजनशील कामात कोणाकडेही अंतिम अधिकार नसतो.”असे भारतातील चित्रपट निर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापराबद्दल बोलताना ते म्हणाले, इफ्फीच्या पुरस्कारांसाठी ज्युरींनी मिळून एकमताने निर्णय निश्चित केले आहे. हा अनुभव खूपच सुखावणारा होता, असे सर्व ज्युरींनी आज वार्तालापादरम्यान सांगितले. (Goa Film Festival)
चित्रपटांचे परिक्षण करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ज्युरी सदस्यांमध्ये शेखर कपूर यांच्या बरोबर जोस लुइस अल्केन, जेरोम पेलार्ड, कॅथरीन दुसार्ट, हेलन लीक यांचा समावेश होता. ज्युरी सदस्यांनी त्यांना आलेल्या अमूल्य अनुभवाची तसेच महोत्सवाच्या आदरातिथ्यामधील आपलेपणाची आणि भव्यतेची उत्कटतेने प्रशंसा केली.
आंतरराष्ट्रीय ज्युरी, प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार विजेत्याची निवड करतील यात सुवर्ण मयूर पुरस्कार आणि दिग्दर्शक आणि निर्मात्यासाठी प्रमाणपत्रांचा समावेश आहे.
सर्वोत्कृष्ट चित्रपटाव्यतिरिक्त, ज्युरी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) आणि विशेष ज्युरी पुरस्कार श्रेणींमध्ये विजेते देखील निवडतील.आंतरराष्ट्रीय स्पर्धा’ विभागासाठी महत्त्वाच्या शैलीतील 15 प्रशंसापात्र चित्रपट निवडले जातात, ज्यात प्रथितयश आणि युवा असे सर्वच दिग्दर्शकांचे नाविन्यपूर्ण आणि कलात्मक चित्रपट प्रतिनिधित्व करत असतात. त्यातून आंतरराष्ट्रीय ज्युरी विजेत्याची निवड करतील.