पणजी – गोव्यात (Goa) सुरू असलेल्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्तम चित्रपट या विभागात सात चित्रपटांची नोंदणी झाली आहे.या स्पर्धा विभागात इफफीने भारतातीलच नाही, तर परदेशातील नवोदित चित्रपट निर्मात्यांना संधी उपलब्ध करून दिली आहे.या विभागात यंदा ऑल्मोस्ट एंटायरली ए स्लाईट डिसास्टर या उमूत सुभासी याने दिग्दर्शित केलेल्या या तुर्की चित्रपटात, इस्तंबूल मधल्या चार स्वतंत्र व्यक्तींचे समकालीन आयुष्य चित्रित केले आहे. हा चित्रपट, नवीन पिढीला भेडसावणाऱ्या चिंतांना अत्यंत कुशलतेने विनोदाची झालर देतो. (Iffi news)
लेट मी गो : मॅक्सिम रॅपाझ दिग्दर्शित आणि स्वित्झर्लंडमध्ये चित्रीकरण झालेला, हा चित्रपट क्लॉडिन, ही एक मुलांच्या जबाबादरीत गुंतलेली आई आणि तिच्या प्रियकरभोवती फिरतो.ओकारिना: ह्या अल्बेनियन चित्रपटाचे दिग्दर्शन, अल्बन झोग्जनी यांनी केले आहे. ओकारिना ही कौटुंबिक समस्यांची एक कथा आहे. नवीन देशात गेल्यावर एका कुटुंबाच्या जीवनशैलीत बदल झाल्यामुळे येणाऱ्या प्रश्नांवर ती बेतलेली आहे. (iffi movie list)
स्लीप: जेसन यू यांनी दिग्दर्शित केलेला दक्षिण कोरियन चित्रपट एका गर्भवती पत्नीची कथा सांगतो, ज्यामध्ये तिच्या पतीच्या झोपेतील विचित्र सवयींमुळे तिची चिंता वाढत जाते.नवऱ्याचे झोपेतील वर्तन आणखी तीव्र झाल्यामुळे हे जोडपे शामनाकडे वळते.
व्हेन द सीडलिंग्स ग्रो: तुर्की चित्रपट निर्माते रेगर आझाद काया दिग्दर्शित हा चित्रपट कोबाने येथील हुसेन आणि त्याच्या कुटुंबाभोवती फिरतो,हेमुडे नावाच्या एका मुलामध्ये गुंतलेले त्यांचे जीवन, आणि त्यांचे जीवन आणि समुदायावर कोबाने युद्धाचे झालेले परिणाम, याचा पट हा चित्रपट आपल्यासमोर उलगडतो.
अक्षर आणि इरादा..
ढाई अक्षर: प्रवीण अरोरा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट अमरीक सिंह दीप यांच्या ‘तीर्थाटन के बाद’ या पुस्तकावर आधारित आहे. उत्तराखंडमध्ये 1980 च्या दशकात घडणारा हा चित्रपट हर्षिताच्या जीवन प्रवासाचे वर्णन करतो, एका संवेदनशील लेखकाबरोबरच्या पत्रव्यवहारामध्ये आपले मन मोकळे करते, आणि त्या आधारावर अपमानास्पद विवाह बंधनातून मुक्त होत आपले जीवन नव्याने सुरु करते. तर इराटा: रोहित एमजी कृष्णन दिग्दर्शित हा भारतीय चित्रपट, जुळ्या वांच्या कथेवर आधारलेला आहे. पोलीस अधिकारी असलेल्या एका भावाच्या हत्येनंतर दुसर् या भावावर आलेल्या संकटाचे चित्रण यामध्ये आहे.