नवी दिल्ली – नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतसह देशभरात या सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून आंदोलनं केली जात आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीदेखील या कायद्याचा विरोध केला आहे. ट्विट करत त्यांनी आपला विरोध दर्शवला होता. इम्रान खानच्या या ट्विटला बॉलिवूड गायक अदनान सामीने उत्तर दिलं आहे
बॉलिवूड गायक अदनान सामीने म्हटले आहे की,’प्रिय पाकिस्तान नागरिकांनो, जे स्वत:हून सुधारित नागरिकत्व कायद्यासंबंधी चर्चेत सहभागी झाले आहेत… जर तुम्ही मुस्लिमांची बाजू मांडत आहात तर सर्वात आधी मान्य करा की त्यांना तुमचा देश सोडायचा होता. यासोबत ते तुमचे अस्तित्वच नाकारत आहेत. दुसरी गोष्टी म्हणजे जर तुम्हाला मुस्लिमांची इतकीच चिंता आहे तर मग तुमच्या सीमारेषा त्यांच्यासाठी सुरु करा अन्यथा शांत राहा’ असे अदनानने ट्विटमध्ये म्हटले आहे.