स्नुकर अजिंक्‍यपद स्पर्धा : विरेन, सय्यद, संकेत, धवल, सौरभ यांची विजयी सलामी

पहिली कॉर्नर पॉकेट करंडक स्नुकर अजिंक्‍यपद स्पर्धा

पुणे – मुंबईच्या विरेन शर्मा, पुण्याच्या साद सय्यद, संकेत मुथा धवल गढवी, सौरभ जाधव, मुकूंद भराडीया आणि नितीश माने यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून येथे होत असलेल्या कॉनर्र पॉकेट क्‍लब तर्फे आयोजित पहिल्या “पहिल्या कॉर्नर पॉकेट करंडक’ खुल्या स्नुकर अजिंक्‍यपद 2019 स्पर्धेत विजयी सलामी दिली.

कॅंपमधील महात्मा गांधी रस्त्यावरील नव्यानेच सुरू झालेल्या कॉनर्र पॉकेट क्‍लबमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत एकूण पुणे शहर आणि परिसरातील 64 खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या पहिल्या फेरीमध्ये मुंबईच्या विरेन शर्मा याने वेदांत दोशी याचा 45-12, 57-12, 42-14 असा सहज पराभव केला. विरेनने वेदांत याच्यावर सहज वर्चस्व गाजवत विजयी सलामी दिली. सौरभ जाधव याने अमेय वेदपाठक याचा 43-21, 32-23, 16-39, 43-28 असा पराभव करून आगेकूच केली.

अतितटीच्या झालेल्या सामन्यात साद सय्यद याने विजय सिदपुरा याचा 33-21, 14-35, 38-23, 21-41, 46-22 असा संघर्षपूर्ण पराभव करून दुसरी फेरी गाठली. अतितटीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात साद याने विजय याच्यावर निर्णायक फ्रेममध्ये विजय मिळवला. प्रत्येक फ्रेमनंतर सामन्यामध्ये रंगत निर्माण होत गेली. 2-2 अशा बरोबरीनंतर साद याने पाचव्या फ्रेममध्ये विजय याचा 46-22 पराभव करून सामना आपल्या खिशात घातला.

धवल गढवी याने नरेश अहीर याचा 32-12, 39-27, 12-36, 40-21 असा तर, संकेत मुथा याने रूपेश शिंदे याचा 42-21, 38-29, 21-37, 33-11 असा पराभव केला. मुकूंद भराडीया याने सिध्दार्थ टेंभे याचा 34-11, 17-34, 46-22, 39-18 असा तर, नितिश माने याने अमरदीप सिंग याचा 31-21, 45-21, 11-34, 46-23 असा पराभव करून आगेकूच केली. स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेचे संचालक चिंतामणी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

सविस्तर निकाल –

पहिली फेरी : (बेस्ट ऑफ फाईव्ह फ्रेम्स्‌) प्रसाद परांडे वि.वि. सत्या पाटील 42-13, 12-36, 45-21, 45-28, विशाल रजानी वि.वि. सिध्दांत फाळे 36-17, 48-27, 20-39, 33-11, अलेक्‍स्‌ रेगो वि.वि. प्रेम कुमार 41-29, 33-09, 10-34, 36-18, विरेन शर्मा वि.वि. वेदांत दोशी 45-12, 57-12, 42-14, सौरभ जाधव वि.वि. अमेय वेदपाठक 43-21, 32-23, 16-39, 43-28, धवल गढवी वि.वि. नरेश अहीर 32-12, 39-27, 12-36, 40-21, सलिल देशपांडे वि.वि. अशिष पाटील 43-21, 38-26, 15-38, 45-25, संकेत मुथा वि.वि. रूपेश शिंदे 42-21, 38-29, 21-37, 33-11, मुकूंद भराडीया वि.वि. सिध्दार्थ टेंभे 34-11, 17-34, 46-22, 39-18, नितिश माने वि.वि. अमरदीप सिंग 31-21, 45-21, 11-34, 46-23, साद सय्यद वि.वि. विजय सिदपुरा 33-21, 14-35, 38-23, 21-41, 46-22.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.