क्रिकेट : ‘जस’ आणि ‘स्पार्क’ स्पोर्टस्‌ अकादमी संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

जस क्रिकेट अकादमी करंडक टी-20 प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा

पुणे  – युनायटेड स्पोर्टस क्‍लब आणि जस क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित जस क्रिकेट अकादमी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित टी-20 प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत जस क्रिकेट अकादमी अमानोरा संघाने डिझायर स्पोर्टस्‌ संघाचा तर स्पार्क स्पोर्टस्‌ अकादमी संघाने तरू क्रिकेट अकादमी संघाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
धानोरी येथील प्रकाश टिंगरे मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत तनिष बगाने अचूक गोलंदाजीच्या बळावर जस क्रिकेट अकादमी अमानोरा संघाने डिझायर स्पोर्टस्‌ संघाचा 130 धावांनी दणदणीत पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पहिल्यांदा खेळताना शिव हरपळेच्या 68 व परम अभ्युदय याच्या नाबाद 41 धावांसह जस क्रिकेट अकादमी अमानोरा संघाने 20 षटकात 3 बाद 173 धावांचा डोंगर रचला. 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तनिष बगाने, हिमेश अगरवाल व समर्थ वाबळे यांच्या भेदक गोलंदाजीपुढे डिझायर स्पोर्टस्‌ संघ केवळ 13.4 षटकात सर्वबाद 43 धावांत गारद झाला. 13 धावांत 5 गडी बाद करणारा तनिष बगाने सामनावीर ठरला.

तर, दुसऱ्या लढतीत शुभ दुबेच्या नाबाद 66 धावांच्या जोरावर स्पार्क स्पोर्टस्‌ अकादमी संघाने तरू क्रिकेट अकादमी संघाचा 86 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना स्पार्क स्पोर्टस्‌ अकादमी संघाने 20 षटकात 3 बाद 150 धावा केल्या. यात अर्णव पुरोहितने 31धावा करून शुभला सुरेख लाथ दिली. 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कनक सहस्त्रबुध्दे, परव गांधी व पलाश शिवनानी यांच्या अचूक गोलंदाजीपुढे तरू क्रिकेट अकादमी संघ 18.3 षटकात सर्वबाद 64 धावांत गारद झाला. शुभ दुबे सामनावीर ठरला.

सविस्तर निकाल-

साखळी फेरी – जस क्रिकेट अकादमी अमानोरा- 20 षटकांत 3 बाद 173 (शिव हरपळे 68, परम अभ्युदय नाबाद 41, श्रेयश यादव 28, महोम्मद कैफ तांबोळी 1-50, पृथ्वीराज 1-27, हर्ष पवार 1-23) वि.वि डिझायर स्पोर्टस्‌- 13.4 षटकांत सर्वबाद 43 (हर्ष पवार 20, तनिष बगाने 5-13, हिमेश अगरवाल 3-3, समर्थ वाबळे 1-4), सामनावीर- तनिष बगाने.

स्पार्क स्पोर्टस्‌ अकादमी – 20 षटकांत 3 बाद 150 (शुभ दुबे नाबाद 66, अर्णव पुरोहित 31, पुष्कर कारखिले 24, शंतनू वीर 1-31) वि.वि तरू क्रिकेट अकादमी- 18.3 षटकांत सर्वबाद 64 (गंधव जाधव 16, प्रणव दल 15, कनक सहस्त्रबुध्दे 4-11, परव गांधी 3-10, पलाश शिवनानी 2-11, अर्णव पुरोहित 1-8), सामनावीर शुभ दुबे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.