टेनिस : ईशाक,तीर्थ, राघव यांचा मानांकित खेळाडूंवर विजय

3000 डॉलर आरबीएल-एटीटी आशियाई मानांकन पुरुष टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धा

मुंबई – प्रॅकटेनिस व एमएसएलटीए यांच्या संलग्नतेने आयोजित आणि आशियाई टेनिस संघटना(एटीएफ) व अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 3000डॉलर आरबीएल-एटीटी आशियाई मानांकन पुरुष टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत बिगर मानांकीत ईशाक ईकबालने अव्वल मानांकीत जतिन दहिया यांचा पराभव करत खळबळजनक निकालासह उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या रत्नाकर बॅंक लिमिटेड(आरबीएल)यांनी प्रायोजित केलेल्या या स्पर्धेत बिगर मानांकीत ईशाक ईकबालने अव्वल मानांकीत जतिन दहियाचा 6-2, 6-1 असा सहज पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. बिगर मानांकीत तिर्थ मचेर्लाने पाचव्या मानांकीत तेजस चौकुलकरचा 2-6, 6-2, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव केला, तर राघव जयसिंघानी याने आठव्या मानांकीत पटलोला रेड्डीचा 6-4, 6-1 असा सरळ सेटमध्ये सहज पराभव कर उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

चौथ्या मानांकीत चंद्रील सुद याने लक्षीत सुदचा 7-6(7), 3-6, 7-5 असा टायब्रेक मध्ये पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. सहाव्या मानांकीत पृथ्वी सेखरने अथर्व शर्माचा 6-1, 6-4 असा तर सातव्या मानांकीत परमवीर बाजवा याने साहिल गवारेचा 6-2, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

सविस्तर निकाल- उप-उपांत्यपुर्व फेरी

ईशाक ईकबाल (भारत) वि.वि जतिन दहिया(भारत)(1) 6-2, 6-1, तिर्थ मचेर्ला (भारत) वि.वि तेजस चौकुलकर (भारत)(5) 2-6, 6-2, 6-4, राघव जयसिंघानी (भारत) वि.वि पटलोला रेड्डी (भारत) (8) 6-4, 6-1, परमवीर बाजवा (भारत) (7) वि.वि साहिल गवारे(भारत) 6-2, 6-4, गोकुळ सुरेश (भारत) वि.वि रोहिन गजारी (भारत) 6-1, 6-1, पृथ्वी शेखर (भारत) (6) वि.वि अथर्व शर्मा (भारत) 6-1, 6-4, चंद्रील सुद (भारत) (4) वि.वि लक्षीत सुद (भारत) 7-6(7), 3-6, 7-5, लक्ष्य गुप्ता (भारत) वि.वि भुपती साकथीवेल (भारत) 6-3, 4-6, 6-3.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.