टोरंटो – रुमानियाची स्टार महिला टेनिसपटू सिमोना हालेपने ब्राझीलच्या बिएट्रिझ हदाद माइआ हिला पराभूत करत कॅनडा ओपन टेनिस स्पर्धेचे तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवले.
हालेपने तीन सेटपर्यंत रंगलेल्या या अंतिम लढतीत 6-3, 2-6, 6-3 असा विजय प्राप्त केला. पहिल्या सेटमध्ये हालेप 0-3 अशी पिछाडीवर होती. यानंतर पुनरागमन करत तिने हा सेट 6-3 असा जिंकला.
THREE-mona Halep!
3️⃣ titles in Canada
2️⃣ in Montreal
1️⃣ in TorontoOne of our finest champions. ❤️@Simona_Halep#NBO22 pic.twitter.com/cSxWoRswo5
— National Bank Open (@NBOtoronto) August 14, 2022
हदादने दुसरा सेट 6-2 असा घेतला. निर्णायक सेटमध्ये मात्र, हालेपने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत 6-3 अशी बाजी मारली आणि विजेतेपद पटकावले.