पुण्याच्या निकिता व सायलीला रजतपदक

पुणे: सांबो फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आशियाई सांबो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिल्ली येथील शहीद पटिक स्पोर्ट कॉम्प्लेक्‍स येथे ही स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत दोन रजतपदकांची कमाई केली. पुण्याच्या निकीता धुमाळ आणि सायली जवंजाळ यांनी ही यशस्वी कामगिरी केली. पुण्याचे अनुप नाईक यांनी भारताचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.

स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 2 सुवर्ण, 5 रजत आणि 6 कांस्यपदके पटकाविली. या स्पर्धेत एकूण 27 देशांनी सहभाग घेतला होता. सायली जवांजळ हिने 44 किलो वजनीगटात रजतपदक मिळविले. तर निकीता धुमाळ हिने 48 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकाविले.

स्पर्धेत महिला युथमध्ये 48 व 60 किलो वजनी गट, पुरुष युथमध्ये 56 किलो, 70 किलो व 87 किलो वजनीगट, महिला ज्युुनियरमध्ये 48 किलो व 60 किलो वजनी गट, पुरुष ज्युनियरमध्ये 52 किलो, 68 किलो व 90 किलो वजनी गट, महिला गटात 52 व 80 किलो वजनी गट, पुरुष गटात 57 किलो, 74, किलो व 100 किलो वजनी गटातील स्पर्धक सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.