नवी दिल्ली : देशात सोन्या-चांदीच्या भावात मागील काही दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे. त्यानंतर आजच्या सोन्या-चांदीच्या भावात थोडीशी वाढ झाली आहे. या आठवड्यात सोने 249 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले असल्याचे आहे. तर चांदीचा भाव प्रति किलो 3,248 रुपयांवर पोहोचला आहे.
या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव 58,670 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. तर चांदी 73,695 रुपये प्रति किलोवर बंद झाली.
गेल्या आठवड्यात, 18 ऑगस्ट, शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,720 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदी 73,695 रुपये प्रतिकिलो दराने विकली गेली. म्हणजेच पाच दिवसांत चांदी 3,248 रुपयांनी महागली आहे.
गेल्या आठवड्यात सोन्याच्या तुलनेत चांदीच्या भावात 13 पटीने वाढ झाली आहे. डॉलर निर्देशांक मजबूत झाल्यानंतर कॉमेक्समध्ये सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. आकडेवारीनुसार, बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सोन्यापेक्षा चांदीच्या भावात अधिक वाढ होईल.