वाघोली – करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेतील लगबग यावर्षी सन्नाटा असलेले चित्र दिसत होते.
हवेली तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या बाजारपेठा आहेत. त्यात उरूळी कांचन, लोणी काळभोर, वाघोली, थेऊर आदी गावांचा समावेश आहे.
त्यामुळे या बाजारपेठांमध्ये वर्षभर मोठी उलाढाल होते. मात्र, यावर्षी बाजारपेठा सुन्न झाल्याचे चित्र दिसत आहे.