मुंबई – महाराष्ट्राचे लाडके “भावोजी’ अर्थात प्रसिद्ध अभिनेते-सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांच्यावर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात घोटाळा केल्याचा आरोप मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी केला होता. यावेळी यशवंत किल्लेदार यांनी आदेश बांदेकर यांच्यावर गंभीर प्रकारचे आरोप केले होते. दरम्यान, आता याच आरोपांना स्वतः आदेश बांदेकर यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे. सध्या त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. आदेश बांदेकर यांच्याकडे शिवसेनेचे नेतेपदही आहे.
आदेश बांदेकर आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, ‘माझ्यावर आणि श्री सिद्धिविनायकांवर तथ्यहिन आरोप करून जगप्रसिद्ध हिंदू देवस्थानाची बदनामी करण्याचे षडयंत्र रचत सवंग प्रसिद्धिसाठी केविलवाणी धडपड करणाऱ्या यशवंत किल्लेदार नामक नक्कलधारी वृत्तीला श्री सिद्धिविनायकांनी खरंच सुबुद्धि द्यावी हिच प्रार्थना. अजूनही मी मर्यादा पाळत आहे’. या आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराबाबत पसरवत येणाऱ्या अफवांवर कृपया विश्वास ठेऊ नये.आजच दादर पोलिस स्टेशन आणि सिद्धिविनायक सि सि टिव्ही टिम च्या सहाय्याने एका माऊलीचे टॅक्सीत राहिलेले काही लाख रूपये परत मिळवून देण्यात यश मिळाल्याबद्दल दादर पोलीस स्टेशन कडून टिमला धन्यवाद देण्यात आले.
— Adesh Chandrakant Bandekar -आदेश चंद्रकांत बांदेकर (@aadeshbandekar) January 28, 2023
तर आदेश बांदेकर आपल्या पुढच्या ट्विटमध्ये म्हणतात, “श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराबाबत पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर कृपया विश्वास ठेऊ नये. आजच दादर पोलिस स्टेशन आणि सिद्धिविनायक सीसीटीव्ही टिमच्या सहाय्याने एका माऊलीचे टॅक्सीत राहिलेले काही लाख रूपये परत मिळवून देण्यात यश मिळाल्याबद्दल दादर पोलीस स्टेशन कडून टिमला धन्यवाद देण्यात आले’. असं देखील ते म्हणाले.
माझ्यावर आणि श्री सिद्धिविनायकांवर तथ्यहिन आरोप करून जगप्रसिद्ध हिंदू देवस्थानाची बदनामी करण्याचे षडयंत्र रचत सवंग प्रसिद्धिसाठी केविलवाणी धडपड करणाऱ्या यशवंत किल्लेदार नामक नक्कलधारी वृत्तीला श्री सिद्धिविनायकांनी खरंच सुबुद्धि द्यावी हिच प्रार्थना.अजूनही मी मर्यादा पाळत आहे.🙏@
— Adesh Chandrakant Bandekar -आदेश चंद्रकांत बांदेकर (@aadeshbandekar) January 28, 2023