मुंबई – अभिनेत्री श्रुती हासन तिच्या अभिनय आणि गाण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. यासोबतच ती तिच्या निर्दोष शैलीसाठीही ओळखली जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती अनेकदा आपले म्हणणे जगासमोर मांडते. सुमारे एक आठवड्यापूर्वीच श्रुती हासन सोशल मीडियावर आली आणि पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) आणि एंडोमेट्रिओसिसशी झालेल्या लढाईबद्दल स्पष्टपणे बोलली.
श्रुती हासननेही PCOS संदर्भात एक लांबलचक नोट शेअर केली आहे. पीसीओएस आणि एंडोमेट्रिओसिसपासून मुक्त होण्यासाठी तिने फिटनेस आणि, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीबद्दल सांगितले. या पोस्टद्वारे श्रुतीने PCOS सारख्या कठीण प्रसंगांना सामोरे जाणाऱ्या महिलांनाही प्रोत्साहन दिले.
तिच्या या पोस्टनंतर चाहतेही तिच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करत आहे. श्रुती हसनच्या या पोस्टमुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्स श्रुतीला प्रकृतीबद्दल प्रश्न विचारत आहे. यातच श्रुती हासनने पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिच्या तब्येतीची माहिती दिली आणि ती पूर्णपणे निरोगी असल्याचे सांगितले. श्रुती म्हणाली की,’मी एकदम ओक्के आहे. आणि पुढे म्हणाली की पीसीओएस आणि एंडोमेट्रिओसिसवरील माझ्या मागील पोस्ट केवळ महिलांना सकारात्मक संदेश देण्यासाठी होत्या.’