उर्फी जावेद ही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. सध्या चित्रपट, मालिका, वेब सिरीज आणि मोठमोठे म्युझिक व्हिडिओ यापासून दूर असली तरी उर्फी आजही चर्चेत असते. आपल्या स्टाईल आणि कपड्यांमुळे बर्याचदा प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी उर्फी नको ते बोलून जाते. नुकतेच तिने असे काही विधान केले की ट्रोलर देखील हैराण झाले.
अनेकदा उर्फीला तिचे चाहते फोटोसाठी घेरतात. पण नुकतीच पावसात बाहेर पडलेल्या उर्फीने एक अजिब विधान केले आहे. जे ऐकून तिच्या फॅन्सला देखील धक्का बसलाय. मस्करीच्या जोशात उर्फी नेमकं काय बोलून गेली हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
झालं असं जेव्हा अतरंगी कपडे घातलेल्या उर्फीला तिच्या कपड्यांबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली, ‘मी एक दिवस कपडे घालणार नाही. मला जे योग्य वाटत मी तसे कपडे घालते उर्फीने यावेळी स्पष्टचं सांगितलं. उर्फीने सांगितले की ती लोकांना आश्चर्यचकित करण्यासाठी नाही तर तिच्या आवडीमुळे असे पोशाख घालते. यादरम्यान तिने स्काय ब्लू वन पीस ड्रेस घातला होता, ज्यामध्ये फ्रंट कट होता. ड्रेससोबतच तिची हेअरस्टाईलही लोकांचे लक्ष वेधून घेत होती.
View this post on Instagram
उर्फीच्या या व्हिडिओवरून तिला ट्रोल देखील केले जात आहे, उर्फीने अनेकवेळा सांगितले आहे की तिला ट्रोलर्समुळे काही फरक पडत नाही. नुकतेच Hauterfly शी झालेल्या संवादात अभिनेत्रीने सांगितले की, ती कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही. तिने इस्लामचा ठेका घेतला नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.