चिंबळी – केळगाव (ता. खेड) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री खंडोबाच्या लग्न सोहळ्या निमित्ताने भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती. केळगाव डोगंरावर पालीच्या श्री खंडोबाचे स्थान म्हणून मंदिर बांधण्यात आले असून येथे दरवर्षी पौष महिन्यात खंडोबा महाराजांची हळद व लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
या सोहळ्या निमित्ताने चिंबळी, केळगाव, मोशी, रासे, भोसे आदि परिसरातील हजारो भाविक दरर्शानासाठी आले होते. या भिविकांनी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून हजारो भाविकांनी जागरण गोंधळ घातला. या लग्न सोहळ्या निमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.