नवी दिल्ली – श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 26 वर्षीय श्रद्धाचा निर्घृण पद्धतीने हत्या करणाऱ्या आफताब विरोधात सर्वांकडूनच रोष व्यक्त केला जात असून, या घटनेमध्ये रोज नवीन धक्कादायक खुलासे होत असल्याचं दिसून येत आहे. नुकतंच आफताबची पॉलीग्राफ चाचणी झाल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात नेण्यात आलं आहे. दरम्यान, अश्यातच एक धक्कादायक प्रकार घडल्याचं पाहायला मिळाला.
आफताबची पॉलीग्राफ चाचणी झाल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात नेलं जात असताना त्याच्यावर चक्क दिल्लीत तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकारामुळे यावेळी एकच खळबळ उडायचं दिसून आलं. मात्र, आरोपींना रोखण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने आपली बंदुक काढून हवेत गोळी झाडण्याचाही इशारा दिला, पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न करूनही आरोपींनी तलवारींनी पोलीस व्हॅनवर वार करणे सुरुच ठेवले. अखेर गाडी चालकाने हा हल्ला करण्याचा प्रयत्न होत असताना गाडी पुढे नेली. आणि हा हल्ला रोखला.
दरम्यान, या सर्व प्रकारानंतर तपासागणित पोलिसांच्या हाती आणखी एक नवीन गोष्ट लागली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आफताबसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणारी श्रद्धा वालकर त्याच्यासोबत ब्रेकअप करणारी होती. मात्र, तिच्या या निर्णयाने संतापलेल्या आफताबने तिची हत्या केली असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले.
‘लिव्ह-इन’मध्ये राहणाऱ्या आफताब आणि श्रद्धामध्ये लहान गोष्टींवरून वाद होत असे. आफताबचे वागणं आणि त्याच्याकडून होणारी मारहाण याला श्रद्धा कंटाळली होती. त्यामुळे तिने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता. श्रद्धाने 3-4 मे रोजी आफताबपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. तिचा हा निर्णय आफताबला पटला नाही. त्यामुळे तो प्रचंड संतापला होता. आणि याच संतापातून त्यांनी तिची हत्या केल्याचं म्हंटलं आहे.
दरम्यान, पोलीस अधिकारी या हत्याकांडाचा तपस अतिश वेगाने करत असून, रोज त्यांच्या हाताला नवीन धक्कादायक खुलासे लागत आहेत. दिल्ली पोलिसांना आतापर्यंतच्या तपासात अनेक पुरावे मिळाले आहेत. आणि त्याच आधारे पोलीस पुढील चौकशी करत आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण…!
श्रद्धा आणि आफताब हे दोघेही काही महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. एका डेटिंग अँपवरून दोघांची ओळख झाली होती. श्रद्धा घरच्यांच्या विरोधात जाऊन आफताबसोबत राहत होती. श्रद्धाने लग्नाचा आग्रह केल्याने आफताबने तिचे 35 तुकडे करून निघृण पद्धतीने हत्या केली. तब्बल सहा महिन्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती.