नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वाद हे एकमेकांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसत आहेत. कारण आता पश्चिम बंगालचे राज्यमंत्री जाकिर हुसेन यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बॉम्ब हल्ल्यात राज्यमंत्री जाकिर हुसेन आणि त्यांचे समर्थक गंभीर जखमी झाले आहेत.
पश्चिम बंगालचे मंत्री जाकिर हुसेन आणि त्यांचे काही समर्थक बुधवारी रात्री मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाकडे जात होते. यावेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी क्रूड बॉम्ब हल्ला केला. राज्यमंत्री जाकिर हुसेन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असुन प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
#WATCH: WB Minister Jakir Hossain injured after unidentified persons hurled a bomb at him at Nimtita railway station, Murshidabad y'day.
Murshidabad Medical College Superintendent says that he's stable & out of danger, one hand & leg injured.
(Amateur video, source unconfirmed) pic.twitter.com/ih7DLHAWLq
— ANI (@ANI) February 18, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालचे राज्यमंत्री जाकिर हुसेन यांच्यावर रात्री ९.४५ च्या सुमारास घडली. कामगार राज्यमंत्री हुसेन हे कोलकाताला जाण्यासाठी ट्रेन पकडण्या करत जात होते. परंतु रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर पोहोचले असता त्यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आला.
या बॉम्ब हल्ल्यात हुसेन यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच इतर जखमींनाही मेडिकल कॉलेज व रुग्णालयात नेण्यात आले आहे. राज्यमंत्री जाकिर हुसेन यांच्यावर कोणी हल्ला केला हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.