सातारा: जावळी तालुक्‍यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण

संतप्त नातेवाइकांचा मेढा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

पाचगणी  – जावळी तालुक्‍यातील दुर्गम, डोंगरकपारीतील एका गावामधील 16 वर्षीय मुलीचे अपहरण चालक म्हणून काम करणाऱ्या देवदास तानाजी साबळे (वय 32, रा. नरफदेव) याने केल्याची मुलीच्या कुटुंबीयांची तक्रार कुडाळ पोलीस दूरक्षेत्रात दाखल करण्यात आली.

त्यानुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे; परंतु पोलिसांनी योग्य तपास केला नाही आणि त्यांच्याकडून योग्य माहिती मिळत नसल्याचा आरोप करून मुलीचे कुटुंबीय व नातेवाइकांनी मेढा पोलीस ठाण्यासमोर बुधवारी ठिय्या मांडल्याने तणाव निर्माण झाला होता.

यासंदर्भात मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलीच्या घरात कोणीही नसल्याचे पाहून देवदास साबळे याने तिचे अपहरण केले. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर चार दिवस होऊनही पोलिसांनी कोणतीच कारवाई न केल्याने कुटुंबीय व ग्रामस्थ अस्वस्थ होते. त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.