कोल्हापुरात प्रेमप्रकरणातून गोळीबार ; आरोपी अटकेत

कोल्हापूर – प्रेमप्रकरणातून कळंबा तलाव परिसरात प्रियकराने पत्नीसामोरच प्रियसी ला मारहाण करून तिच्यावर गोळीबार केला. बंदुकीतील छर्रे लागण्याने यात ती जखमी झाली. शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवर या प्रकरणी प्रियकर ऋषिकेश बाबुराव कोळी (वय 35), पत्नी अर्चना ऋषिकेश केळी ( वय- 30 रा. मुगदुम कॉलनी, पाचगाव व त्याची पत्नी यांच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयीत ऋषिकेश याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी कि, पाचगाव परिसरात राहणाऱ्या ऋषिकेश याचे कळंबा परिसरात राहणाऱ्या युवतीशी प्रेमसंबध होते. या तरुणाचे लग्न झाले असून त्याची पत्नी अर्चना यांना दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती नव्हती. आज सकाळी युवतीने तरुणाच्या मोबाईलवर पाठवलेला प्रेम संदेश त्याच्या पत्नीने पाहिला. त्यानंतर पतीने संबधित युवतीला फोन लावून कळंबा तलावाजवळ भेटाययली बोलावले.साडे सात ऋषिकेश हा पत्नीला घेऊन तिथे आला.

युवतीला पाहून तरुणाच्या पत्नीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दोघींमध्ये झटापट झाली. तेव्हा ऋषिकेश याने कार मधून आणलेल्या एअरगन मधून युवतीवर गोळी झाडली. त्यातील छर्रे युवतीला लागल्याने ती जखमी झाली. या गोळीबारामुळे परिसरातील नागरिक त्या ठिकाणी आले. नागरिक येताच ऋषिकेश व त्याच्या पत्नीने तिथून पळ काढला. मुलीच्या आईने करवीर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ऋषिकेश व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.