आंतरराष्ट्रीय दत्तक नियमांमध्ये आता आली सुलभता

नवी दिल्ली – केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या दत्तक प्रक्रियेत आता सुलभता आणली आहे. त्यासाठी हिंदु दत्तक आणि पोटगी कायद्यामध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार भारतातातील सेंट्रल ऍडॉप्शन रिसोर्स ऍथॉरिटीकडून (सीएआरए) ना हरकत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्या आधारे दत्तक घेतलेल्या मुलाला विदेशात घेऊन जाणे सोपे होणार आहे.

आत्तापर्यंत यासाठी कोर्टाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागत असे. आत्तापर्यंत या कायद्या अंतर्गत हिंदु, शिख, बौद्ध आणि जैन यांच्यासाठी दत्तकाच्या संबंधात निश्‍चीत अशी नियमावली नव्हती. आता या संबंधात नवीन नियमावली निश्‍चीत करण्यात आली असून त्याची अधिसूचना महिला आणि बालकल्याण विभागाने जारी केली आहे.

केंद्र सरकारची सीएआरए ही ऍथॉरिटी हेग करारान्वये मान्यता प्राप्त देशांत बालके दत्तक देण्याच्यासंबंधात ना हरकत दाखला जारी करणार आहे. मुल दत्तक देणाच्या संबंधात जिल्हा मॅजिस्ट्रेट कडून व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट जारी केले जाते. त्या सर्टिफिकेटच्या आधारे सीएआरए कडून ना हरकत दाखला जारी केला जाणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.