बुलढाणा – पोलीस दलातील कार्यरत असलेल्या पत्नी वर्षा कुटे आणि दीड वर्षांच्या चिमुकल्याची धारधार शस्त्राने हत्या केली. यानंतर पती किशोर कुटेने स्वत: आत्महत्या केल्याने बुलढाण्यात एकच खळबळ उडाली आहे. बुलढाण्याच्या चिखली पोलीस स्टेशनमध्ये वर्षा कुटे या कार्यरत होत्या. वर्षा कुटेचे पती हे शेतकरी होते.
वर्षा कुटे आणि किशोर कुटे यांना आठ वर्षाची आणि दीड वर्षांच्या दोन मुली आहेत. आज वर्षा कुटे या दुपारी कर्तव्य बजावल्यानंतर घरी परतल्या. तेव्हा पती किशोर कुटेंनी पत्नींची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. यानंतर आपल्या दीड वर्षाची चिमुकलीची देखील हत्या केली.
पत्नी आणि मुलींची हत्या केल्यानंतर किशोर कुटेंनी शहरापासून काही अंतरावर असलेल्या गांगलगाव शिवारात जाऊन स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने, यात आठ वर्षांची मुलगी ही शाळेत गेल्याने बचावली.