धक्कादायक !देशात पहिल्यांदाच 24 तासात 14 हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई : देशात आता कोरोनाने हाहाकार घालण्यास सुरुवात केली आहे. कारण मागच्या आठवड्यात १० हजाराने वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. देशात पहिल्यांदाच 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार पेक्षा जास्तने वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार 516 ने वाढ झाली तर 375 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 95 हजार 048 वर पोहोचला आहे. त्यापैकी एकूण 2 लाख 13 हजार 831 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 54.12 टक्के इतका आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 68 हजार 269 इतके आहेत. गेल्या 24 तासात 9 हजार 120 रुग्ण बरे झाले आहेत तर 375 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण बळींची संख्या 12 हजार 948 इतकी झाली आहे.

महाराष्ट्रात काल 3827 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.49 टक्के एवढा आहे. राज्यात काल 1935 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 62 हजार 773 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 55 हजार 651 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. सर्वात जास्त ज्यादा ॲक्टिव्ह केसेस महाराष्ट्रात आहेत. यानंतरर दिल्ली, तमिलनाडू, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ॲक्टिव्ह केसेस आहेत. ॲक्टिव्ह केसेसमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.