नेवासा – केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह दुसऱ्या गटाला दिल्यामुळे हा मोठा अनाकलनिय व दुर्देवी निर्णय आहे. मी केवळ उद्घव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा विश्वास आमदार शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला.
आमदार गडाख म्हणाले की, निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह दुसऱ्या गटाला देण्याचा निर्णय घेतलेला असला तरी यामुळे मूळ शिवसेनेचे कार्यकर्ते खचून न जाता पेटून उठतील. रक्ताचे पाणी करून शिवसैनिक गावागांवामध्ये व घराघरांमध्ये जावून स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ शिवसेनाच्या विचाराचा प्रसार करतील.
केंद्रीय निवडणूक आयोगाने चिन्ह काढून घेऊन दुसऱ्या गटाला बहाल केले हा अनाकलनिय व दुर्देवी निर्णय असल्याची जळजळीत प्रतिक्रिया आमदार गडाखांनी देत निवडणूक आयोगाच्या निकालाचा हा निर्णय अनाकलनिय असल्याचे सांगितले. आमदार गडाख यांनी प्रथमच निवडणूक आयोगावर चांगलीच आगपाखड करून चिन्ह नसले तरी शिवसेना खचून न जाता आता शिवसैनिकच पेटून उठतील, असा गर्भित इशारा दिला.
स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार तळागाळापर्यंत पोहविण्याचे काम करतील, असा विश्वास व्यक्त केला. मी उद्धव ठाकरे यांच्यामागे खंबीरपणे उभा असल्याचे सांगत राज्यातील शिवसेनेच्या आमदारांनाही एक प्रकारचा धीर देऊन पक्षालाही संकटात साथ देण्याचे अभिवचन आमदार गडाख यांनी नेवासा येथे दिले.