भोपाळ – नामिबियातून भारतात आणण्यात आलेल्या चित्त्यांना महिनाभरात मुक्त करून त्यांना जंगलात सोडले जाईल अशी माहिती मध्यप्रदेशचे वनमंत्री विजय शाह यांनी सांगितले. अंदाजे एका महिन्यात दोन नर चित्त्यांना जंगलात सोडले जाईल.
अद्याप तारीख निश्चित केलेली नाही. नर चित्त्यांना सोडण्यात आल्यानंतर त्यांची परिस्थिती पाहून मादी चित्त्यांना सोडले जाईल असे ते म्हणाले. नामिबियातील विंडहोक येथून ग्वाल्हेरला आणण्यात आले आणि त्यांना कुनो येथे संरक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यांना अजून मुक्त करून जंगलात सोडण्यात आलेले नाही.
दरम्यान, देशात दक्षिण अफ्रिकेतून आणखी 12 चित्ते आणण्यात आले असून त्यांनाही कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवले जाणार आहे. सध्या हे चित्ते क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहेत. भारतातून चित्त्यांची प्रजाती नष्ट झाल्याने विदेशातून हे चित्ते भारतात आणून वन्यप्राणी संपदा समृद्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे.