नगर – निबळक येथील नागरिकांना जनहित सुविधा मिळविण्यासाठी तसेच तलाठी व ग्रामसेवक या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या पिळवणुकीबाबत निंबळक शिवसेना शाखेच्या वतीने आज दिनांक 16 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
गावात डास निर्मूलनासाठी औषध फवारणी करण्यात यावी, दत्त मंदिर चौकात धुळ व वाहतुकी पासून नागरिकांना संरक्षणासाठी उपाययोजना करावी. दत्त मंदिर चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा, चौकात कचराकुंडीचे व्यवस्था करण्यात यावी. उघड्या गटारीवर चेंबर बसून खड्ड्याची डागडुजी करून रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यात यावेत. गावातील नवीन पात्रता नोंदणीकृत असलेल्या ठेकेदारांना कामे देण्यात.
भाजी मंडईसाठी स्वतंत्र बाजारपेठ उभारावी. दिवसाआड पाणी सोडण्याची व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी स्वतंत्र हॉल बांधण्यात यावा. नादुरुस्त घरकुले दुरुस्त करावी. प्रत्येक चौकात पथदिवे बसविण्यात यावे तसेच आरोग्य केंद्रात उपलब्ध सुविधा करून देण्यात यावेत. शासकीय योजना साठी लागणारे दाखले वेळेवर देण्याची सोय करावी. प्राथमिक शाळा निंबळक इथे असलेली मंगल कार्यालयाची दुरुस्ती करून ते गरजूंसाठी अल्पदरात देण्यात यावे. तलावात मच्छी व्यवसायासाठी भिल समाजाला देण्यात यावी.
स्मशानभूमीचे नूतनीकरण करावे. माजी सैनिकांना घरपट्टी पाणीपट्टी माफ करावी. ऑनलाइन नोंदणीचे प्रकरण मार्गी लावून सातबारा आठ तातडीने देण्यात यावे . संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची प्रकरण तहसील कार्यालय पाठवावे. गावात चोरीचे प्रमाण वाढले असून सीसीटीव्ही व ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात यावी. या मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी , पंचायत समिती गटविकास आधिकारी यांना 9 जानेवारी ला निवेदन देण्यात आले होते .
या मागण्याबाबत कार्यवाही न झाल्यामुळ हे उपोषण करण्यात आले . या उपोषणाला माजी आमदार अनिल राठोड यांनी भेट दिली. या उपोषनात माधवराव कोतकर, जिल्हा नियोजन समिती अविनाश कोतकर, संदीप कळसे, नंदू कोतकर, विष्णू होळकर, नाना दिवटे, रघुनाथ गव्हाणे, साहेबराव मदने, हरीश कळसे, संजय चौधरी, प्रदिप कोरडे, अशोक कळसे, जालिंदर कोतकर, विकास चव्हाण, अशा रोकडे, विजय कोतकर यावेळी उपस्थित होते