Rahul Narvekar Loksabha Election 2024| आगामी लोकसभेसाठी भाजपकडून मुंबईमधील सहापैकी पाच जागांवर दावा केला जात आहे. यातील पहिल्या यादीत भाजपने मुंबईतील दोन उमेदवारांची घोषणा करताना दोन विद्यमान खासदारांचा पत्ता कट करत त्याठिकाणी पियुष गोयल आणि मिहीर कोटेचा यांना उमेदवारीच्या रिंगणात उतरवले आहे. दुसरीकडे, दक्षिण मुंबईतून भाजपकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. मात्र दक्षिण मुंबईमधील काही शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत या मतदारसंघांमध्ये शिवसेनेचा उमेदवार उतरवावा अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे की, ‘आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचे तमाम हिंदुस्थानाचे स्वप्न आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते यासाठी दिवसरात्र काम करून हे स्वप्न साकार करू, पण हे करत असताना आम्ही दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अपेक्षित करतो. Loksabha Election 2024|
कारण हा मतदारसंघ मूळ शिवसेनेचा आहे. या मतदारसंघात आतापर्यंत धनुष्यबाण हे चिन्ह चालत आलं आहे. या लोकसभा मतदारसंघात कट्टर शिवसैनिकांच्या फौजा आहेत. 2014 आणि 2019 साली या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार जिंकत आला आहे.
दक्षिण मुंबईतल्या घराघरात धनुष्यबाण पोहोचला आहे. कट्टर सैनिक या दक्षिण मुंबईतून उमेदवार असेल, तर पक्षाची दक्षिण मुंबईतील ताकद आणखी वाढेल. आपण शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आहात. आपण आमच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून आम्हाला न्याय द्याल ही अपेक्षा आहे, असे शिवसैनिकांनी लिहिले आहे. यावर आता एकनाथ शिंदे काय घेणार हे पाहावे लागणार आहे. Loksabha Election 2024|
हेही वाचा: