शिरूर तहसीलदार लैला शेख यांच्या ग्रामपंचायत व नगर परिषद यांना सूचना
शिरूर (प्रतिनिधी) : शिरूर तालुक्यात कुठल्याही ग्रामपंचायत गावात, शिरूर शहरात कोणीही मुंबई-पुणे व इतर शहरातील व्यक्तीने प्रवेश परवानगी पत्र, विना पास अवैधरीत्या प्रवेश केला असल्यास व संस्थात्मक विलगीकरणास सहकार्य करत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 मधील तरतुदीनुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा अशा लेखी सूचना शिरूर तहसीलदार लैला शेख यांनी केले आहे.
सदर बाब ग्रामपंचायत व नगरपालिका शिरूर यांनी अतिशय गांभीर्यपूर्वक घेऊन त्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी व याबाबत कोणत्याही व याबाबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करण्यात येऊ नये असेही पत्रात सांगितले आहे.
गेल्या काही दिवसापासून शिरूर तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई,पुणे यासारख्या कोरोना पादुर्भावग्रस्त शहरातून छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात शिरूर तालुक्यात लोक स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्याच्या विशेषता ग्रामीण भागात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोना संसर्ग प्रभावित जिल्ह्यातून आलेल्या अशा नागरिकांना संस्थापक विलगीकरनात ठेवणे अपेक्षित होते. परंतु तसे काही केले नसल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येत आहे. अशा प्रभावी जिल्ह्यातून आलेल्या व्यक्ती गावात इतर व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे कोरोना विषाणू संसर्ग आणखी व्यापक प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे तहसीलदार यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, मुंबई पुणे अशा पादुर्भाव ग्रस्त शहरातून जे लोक छुप्या मार्गाने किंवा अवैध रित्या शिरूर तालुक्यातील ज्या गावांमध्ये प्रवेश करतील अशा व्यक्तीवर ग्राम दक्षता समितीद्वारे पर्यवेक्षण करण्यात यावें, अशा व्यक्ती योग्य त्या प्रवेश परवानगी पत्रासह(पास) आली आहे काय याची खातरजमा करावी ,तसेच अशा व्यक्तीच्या ज्या ग्रामपंचायत प्रभागातील घरात आला असेल अशा प्रभागाचे ग्रामपंचायत सदस्य यांनी संबंधित याची माहिती तात्काळ संबंधित पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत समिती ,तहसील कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्रास द्यावी तसेच त्यांना सक्तीने संस्थापक विलगीकरण करण्यात यावी. त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत व्यक्तिपरत्वे भेदभाव होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असेही तहसीलदार लैला शेख यांनी सांगितले.
विनापास किंवा विनापरवानगी प्रवेश करणारे व संस्थात्मक विलगीकरनास सहकार्य करत नसल्यास विरोध करणाऱ्या किंवा नकार देणाऱ्या व्यक्तीवर साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 मधील तरतुदीनुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायत व शिरुर नगर परिषद यांना दिले आहेत.