शिरुर (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरूर शहरासह 4 गावात 8 कोरोना बाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे व शिरूर ग्रामीणचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली आहे. यामुळे शिरूर शहरात व तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आज शिरूर शहरातून व तालुक्याच्या विविध भागातून 69 जणांचे कोरोना तपासणीकरिता नमुने पाठवण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शिरूर शहरात जोशीवाडी भागात राहणारा 31 वर्ष कंपनी कामगार कोरोना बाधित आढळला असून त्याच्यावर पारनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. शिरूर नगर परिषदेच्या वतीने हा कामगार राहत असलेल्या परिसररात जंतुनाशक फवारणी केली असून हा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
शिरूर शहरात जोशी वाडी भागात 1, तळेगाव ढमढेरे 2, गणेगाव दुमाला 1 , कोरेगाव भीमा 4 असे चार गावात 8 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. शिरूर शहरात आजपर्यंत 37 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. शिरूर तालुक्यात आतापर्यत एकूण 215 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत.