बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपटाची निर्मिती करणे आणि ऍपवर अपलोड करणे याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर शिल्पा सोशल मीडियापासून काही काळ दूर राहिली होती. आता पुन्हा एकदा शिल्पाने सोशल मीडियावर धमाकेदार वापसी केली आहे.
शिल्पा शेट्टी सतत चाहत्यांसोबत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. शिल्पाच्या “संडे बिंज’ व्हिडीओपासून तिच्या वर्कआउट क्लिपला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. आता पुन्हा एकदा शिल्पाच्या नवीन पोस्टवर चाहते तिच्यासोबत डोलताना दिसून येत आहे.
View this post on Instagram
या नवीन व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी ही रणवीर सिंहच्या “ततड-ततड’ गाण्यामधील हुक स्टेपवर थिरकताना दिसत आहे. या गाण्यातील शिल्पाचे हावभाव खुपच जबरदस्त आहेत. हा व्हिडीओ शेअर करत शिल्पाने लिहिले की, बऱ्याच दिवसांनंतर डान्स करण्याचा मूड झाला आहे.
त्यामुळेच मी रणवीर सिंहच्या डान्स स्टाइलवर इनफ्लुएंस झाली. दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला असून यावर असंख्य चाहत्यांनी कमेंटस् करत शिल्पाचे कौतुक केले आहे. तसेच अनेक जण हा व्हिडीओ री-पोस्टदेखील करत आहे.