देहूगाव – तीर्थक्षेत्र देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले आहे. नगरपरिषदेची आगामी सार्वत्रिक निवडणूक 2011 च्या जनगणना आणि शासकीय नियमांच्या अनुषंगाने होणार आहे.
नगरपंचायत हद्दीतील 17 प्रभाग (वार्ड) रचनेचे प्रारूप नकाशा व सीमा हद्द प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना लेखी स्वरूपात मंगळवार (दि. 16) दुपारी 3 वाजेपूर्वी देहू नगरपंचायत कार्यालयामध्ये मागावल्या आहेत.
लेखी स्वरूपातील सूचना व हरकती जमा करण्यासाठी शनिवार (दि. 13) व रविवार (दि.14) कार्यालय सुरू असणार आहे. हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणी करिता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्र कळविण्यात येईल.
तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुधवारी (दि. 17) सुनावणी होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी संजय अस्वरे आणि नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी दिली आहे.
1) उत्तरेस -इंद्रायणी नदी, पूर्वेस – सरकारी गायरान व ब्रह्मविद्यालय आश्रम, दक्षिणेस – भीमाशंकर सोसायटी रस्ता व भीमाशंकर मंदिर, पश्चिमेस – गाथा मंदिर.
2) उत्तरेस -गायरान व वनीकरण, तळवडे शिव रस्ता, पूर्वेस –
इंद्रायणी नदी, दक्षिणेस -बैलगाडा घाट रस्ता, देहू-आळंदी रस्ता व खंडेराया मंडळ, पश्चिमेस – साकळी रस्ता व भीमाशंकर सोसायटी रस्ता.
3) उत्तरेस -बैलगाडा रस्ता, पूर्वेस – शिव रस्ता तळवडे, दक्षिणेस – सरकारी घरकुल, पश्चिमेस –
खंडोबा मंदिर.
4) उत्तरेस -सरकारी गायरान, घरकुल रस्ता, पूर्वेस – तळवडे शिव रस्ता, दक्षिणेस – देहू आळंदी रस्ता, पेट्रोलपंप, पश्चिमेस – विठ्ठल मंदिर, देहू आळंदी रस्ता.
5) उत्तरेस -देहू आळंदी रस्ता, विठ्ठलवाडीचा राजा गणपती मंडळ, पूर्वेस – तळवडे हॉस्पिटल, शिवरस्ता, दक्षिणेस- कॅन्टोमेंट हद्द, पश्चिमेस – काळोखेवाडा रस्ता.
6) उत्तरेस -देहू आळंदी रस्ता, पूर्वेस – काळोखेवाडा रस्ता, मुंगसे आळी, दक्षिणेस – कॅन्टोंमेंट हद्द, पश्चिमेस – काळोखेवाडा रस्ता, विठ्ठलनगर, माळीनगर हद्द, जुना पालखी मार्ग.
7) उत्तरेस -दिगांबर माळी निवास, रस्ता, पूर्वेस – निसर्ग सोसायटी रस्ता, नवचैतन्य सोसायटी, दक्षिणेस – देहू आळंदी रस्ता, पश्चिमेस – ओंकार सोसायटी दक्षिण भाग, ओम
साई सोसायटी.
8) उत्तरेस -काळोखे शेती व एस. टी. स्टॅंड परिसर, पूर्वेस – ओंकार सोसायटी, दक्षिणेस -देहू आळंदी रस्ता, पश्चिमेस – देहू ते देहूरोड रस्ता, एस. टी. स्टॅंड ते कमान.
9) उत्तरेस -1.1 बाह्यवळण रस्ता, ओढ्यापर्यंत, पूर्वेस – साईदर्शन सोसायटी व इंद्रायणी सोसायटी, दक्षिणेस – देहूरोड रस्ता, कॉरपोरेशन बॅंक, पश्चिमेस – गाथा मंदिर रस्ता, चावडी.
10) उत्तरेस -येलवाडी रस्ता, 1.1 बाह्यवळण रस्ता, भैरवनाथ चौक, पूर्वेस – फोरएस इंग्लिश मीडियम स्कूल, दक्षिणेस – जुना ओढा, खान, सार्वजनिक हाप्सा, पोलीस चौकी, पश्चिमेस – इंद्रायणी.
11) उत्तरेस -प्राथमिक आरोग्य केंद्र, देहूरोड रस्ता, पूर्वेस – देहू – देहूरोड रस्ता, संभाजी चौक, दक्षिणेस – महाद्वार रस्ता काही भाग, मोरे यांचे निवास, पश्चिमेस – जंगली महाराज रस्ता, महाव्दार चौक.
12) उत्तरेस -चौदा टाळकरी कमान, सुंदर गल्ली रस्ता शिंदे ट्रेडर्स, पूर्वेस – शिवाजी चौक, जंगली महाराज रस्ता, दक्षिणेस – इनामदार वाडा, पश्चिद, सुतार आळी, पश्चिमेस – इंद्रायणी नदी घाट.
13) उत्तरेस -सुतार आळी रस्ता व गावडे हॉस्पिटल, पूर्वेस देहू – देहुरोड रस्ता, मुख्य कमान व बॅंक ऑफ महाराष्ट्र, दक्षिणेस – पाण्याच्या टाकीचा रस्ता, महालक्ष्मी मंदिर, पश्चिमेस – शिवाजी चौक ते संभाजी चौक.
14) उत्तरेस -खंडोजी बाबा धर्मशाळा व महावितरण ऑफीस, पूर्वेस – पद्मश्री हॉस्पिटल, सह्याद्री सोसायटी रस्ता, जुना पालखी मार्ग, पोस्ट ऑफीस, दक्षिणेस – कापूर ओढा, परंडवाल चौक, पश्चिमेस – इंद्रायणी नदी माळीनगर हद्द.
15) उत्तरेस -इंद्रायणी नदी, पूर्वेस – बोडकेवाडी रस्ता, परंडवाल चौक, महात्मा फुले चौक, दक्षिणेस – कॅंन्टोंमेंट हद्द, जगताप मळा, पश्चिमेस – इंद्रायणी नदी.
16) उत्तरेस -देहू- देहूरोड रस्ता, अनगडशाहवली दर्गा, महात्मा फुले चौक, पूर्वेस – विठ्ठलनगर माळीनगर हद्द, गुलमोहर पार्क सोसायटी, दक्षिणेस – देहूरोड कॅंटेनमेंट हद्द, पश्चिमेस – जिल्हा परिषद शाळा, माळीनगर व देहू – देहूरोड रस्ता.
17) उत्तरेस -बोडकेवाडी रस्ता, कृष्ण मंदिर, पूर्वेस गर्ग प्रोव्हीजन स्टोअर्स,देहू – देहूरोड रस्ता, दक्षिणेस- कॅंन्टोमेंट हद्द, पश्चिमेस –
बोडकेवाडी रस्ता.