काबुल : अफगाणिस्तानवर तालिबानने पूर्णपणे ताबा मिळवल्यानंतर त्यांनी आपली सर्व क्षेत्राविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात महत्वपूर्ण भूमिका महिलांच्या बाबतीत असल्याचे म्हटले जात आहे. तालिबानने महिलांच्या अधिकारांसंदर्भात आपली भूमिका शिथिल केली आहे. मात्र, तालिबानच्या हल्ल्यातून जीव वाचलेल्या एका महिलेने तालिबानच्या क्रुरतेविषयी माहिती दिली आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन हादरून जाईल.
तालिबानी शिक्षेत महिलांना मारून कुत्र्यांना खाऊ घातले जाते, असा खळबळजनक दावा या महिलेने केला आहे. एक वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतात गेल्या वर्षी तालिबानच्या दहशतवाद्यांनी 33 वर्षीय खतेरा यांना गोळी घातली होती. या हल्ल्यात त्या कशाबशा जीवंत वाचल्या. खतेरा यांनी सांगितले, की “तालिबानच्या दृष्टीने, महिला केवळ मासाचा पुतळा आहे, ज्यांच्यात जीव नाही, त्यांना केवळ मारहाण केली जाते.” अशी त्यांची मानसिकता असल्याचे त्यांनी म्हटले/
पीडित महिलेने सांगितले, की हल्ल्यानंतर त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या नोव्हेंबर 2020 पासून पती आणि मुलासह दिल्लीत उपचारासाठी राहत आहेत. महिलेने सांगितले, की त्यांचे वडील तालिबानचे एक दहशतवादी होते. त्यांनी खतेरावर हल्ल्याचा कट रचला होता. खतेरा अफगाणिस्तान पोलिसांत काम करत होत्या.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्या गर्भवती असतानाच तालिबानने त्यांना प्रचंड मारहाण केली होती. ड्यूटीवरून घरी जाताना त्यांना तीन तालिबानी दहशतवाद्यांनी रोखले होते. यानंतर त्यांनी खतेरा यांचा आयडी तपासला आणि नंतर, त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांना आठ गोळ्या लागल्या होत्या. एवढेच नाही, तर त्यांच्यावर चाकूनेही वार करण्यात आले होते. यानंतर त्या बेशुद्ध झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यावर चाकूने वार केले आणि त्यांना मरण्यासाठी सोडून दिले.
एवढेच नाही, तर तालिबान महिलांसोबत अतिशय क्रुरपणे वागते. कधी-कधी अम्हाला कुत्र्यांना खाऊ घातले जाते. मी नशीबवान आहे, की मी यातुन वाचले. अफगाणिस्तानात तालिबानच्या अधिपत्याखालीच रहावे लागते. येथे महिला, मुलं आणि अल्पसंख्यकावर काय काय अत्याचार केले जातात, याची कल्पना करणेही अवघड आहे, असेही खतेरा म्हणाल्या.