मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. तसेच त्यांचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस प्रकाशझोतात आल्या आहेत. याच कारण म्हणजे अमृता फडणवीस यांनी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,’एका महिलेने फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून अमृता फडणवीस यांना शिवीगाळ करत आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यानंतर सायबर पोलिसांनी ठाण्यातून महिलेला अटक केली आहे.
अमृता फडणवीस यांनी फेसबुकला एक पोस्ट केली होती. त्या पोस्टवर एका युजर्स आक्षेपार्ह शब्दात कमेंट करत शिवीगाळ केली होती. यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर, ही पोस्ट डिलीट करण्यात आली. तसंच अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला होता.
पोलिसांनी केलेल्या तपासात महिलेने आपली ओळख लपवण्यासाठी गणेश कपूर नावाने अकाऊंट तयार केलं होतं. पोलीस तपासात आयपी अॅड्रेस आणि मोबाइल एका महिलेच्या नावावर असल्याचं निष्पन्न झालं. ही महिला ठाण्यातील रहिवासी असल्याचं समजल्यानंतर रात्री तिला तेथून अटक कण्यात आली. महिलेने याआधीही अनेकदा अशा पोस्ट केल्याची माहिती मिळत आहे.