Shashi Tharoor Remark On Congress : काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी काँग्रेस पक्षाला ‘गांधी घराण्याचा पक्ष’ संबोधले होते. त्याच्या या वक्तव्यावरून राजकीय चर्चा रंगल्यानंतर आता त्यांनी यावर स्पष्टीकर दिले आहे. त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगत विरोधकांवर टीका केली आहे.
केरळमध्ये एका टेक कंपनीच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी थरूर यांनी पुढील पंतप्रधान म्हणून राहुल गांधींच्या संधींबद्दलही भाष्य केले होते. यावर स्पष्टीकरण देताना, त्यांनी म्हटले आहे की आपल्या विधानाला चुकीच्या पद्धतीने घेतले गेल्याचे म्हटले. तसेच त्यांचा असा विश्वास आहे की नेहरू/गांधी कुटुंब ही पक्षाची “शक्ती” स्थाने आहेत.
पुढे थरूर म्हणाले, “मी एका खाजगी कार्यक्रमात माझं वैयक्तिक मत मांडले आहे., जे औपचारिक विधान नव्हते. त्याची चुकीची माहिती दिली जात आहे. होय, मी पुन्हा पुन्हा सांगितले आहे की नेहरू/गांधी कुटुंबाचा डीएनए काँग्रेस पक्षाशी अतूटपणे जोडलेला आहे. गांधी घराणे ही पक्षाची ताकद आहे.
थरूर यांनी ट्विटर वर पोस्ट करत, “मी जे म्हटले नाही ते असे आहे की मला शंका नाही की पक्षातील कोणत्याही मतदानात राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची पहिली पसंती असतील.” असे म्हणत त्यांनी आपल्याच विधावरून युटर्न घेतला आहे. या अगोदर त्यांनी आगामी लोकसभेसाठी काँग्रेसकडून पंतप्रधानपदासाठी मल्लिकार्जुन खरगे याना पसंती दिली होती.