मुंबई – अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आई झाल्यानंतर तिच्या चिमुकल्या मुलीला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करते. सोशल मीडियावर बिपाशी मुलगी देवीचे अनेक व्हिडिओ शेअर करताना दिसते. तिच्या व्हिडिओ नेटकऱ्यांची देखील खूप पसंती मिळताना दिसते. आता पुन्हा एकदा बिपाशाने देवीचा एक क्युट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
बिपाशाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये देवी गुलाबी फुलांच्या ड्रेसमधली खेळताना पाहायला मिळत आहे. तसेच ती जमिनीवर रांगतानाही दिसतेय. तर बिपाशाने पिवळ्या रंगाचा सूट घातलेला असून तीही अगदी सुंदर दिसत आहे. शिवाय, या व्हिडीओला तिने ‘छोटी सी आशा’ हे गाणं जोडलं आहे. देवीचा हा फोटो व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून याला लाइक्स आणि कमेंट मिळाल्या आहेत.
दरम्यान, अभिनेत्री बिपाशा बासूने 12 नोव्हेंबर 2022 रोजी एका सुंदर मुलीला जन्म दिला. काही महिन्यांपूर्वी तिने तिच्या लेकीचे फोटो शेअर करत तिचे नाव ‘देवी’ ठेवल्याचे सोशल मीडियाद्वारे सांगितले होते. ती अनेकदा आपल्या लाडक्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
View this post on Instagram
बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर आपल्या मुलीच्या जन्मामुळे खूप आनंदात आहे अलोन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते. त्याचेवळी दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 2001 मध्ये ‘अजनबी’ या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
यापूर्वी बिपाशाने देवीचा झोपतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये देवीचे वडिल करण सिंग ग्रोव्हर हनुमान चालीसा तिला ऐकवताना दिसत होते. देवी देखील शांतपणे हनुमान चालीसा ऐकत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले.