शरद पवार यांची उद्या सोलापूरात बैठक

सोलापूर: एकापाठोपाठ एक नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोडून जात असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मंगळवार, दि. 17 सप्टेंबरपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात असून या दौऱ्याची सुरुवात सोलापूरातून होणार आहे.

शरद पवार यांच्या उपस्थित मंगळवारी सकाळी 11 वाजता सोलापूरात हुतात्मा स्मृती मंदिरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीला आजी-माजी आमदार, प्रदेश पदाधिकारी, प्रतिनिधी, प्रमुख नेते, विधानसभेचे इच्छुक उमेदवार, जिल्हा कार्यकारिणी, आजी-माजी जिल्हा परिषदेचे तसेच पंचायत समितीचे पदाधिकारी व सदस्य आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीनंतर शरद पवार हे उस्मानाबाद येथे सायंकाळी 4 वाजात बैठक घेऊन बीडला मुक्कामी जाणार आहेत. 18 सप्टेंबरला 11 वाजात बीड जिल्ह्याची बैठक आटोपून ते लातूर जिल्ह्याची सायं. 4 वाजता बैठक घेणार घेऊन नांदेड येथे मुक्काम करणार आहेत. 19 सप्टेंबरला सकाळी 11 वाजात वसमत येथे हिंगोली जिल्ह्याची बैठक होणार आहे. परभणी येथे दुपारी 3 वा. बैठक घेऊन जालन्याला मुक्कामी जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.