गायक आनंद शिंदे व अल्बमचे निर्माते मंगेश मोरे यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार
मांजरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्राची शान या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आधारीत, नवीन अल्बम साँगचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते मुंबई येथे वाढदिवसाच्या भव्य सोहळ्यात करण्यात आले. पहिल्याच दिवशी या गाण्याने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला.
मुंबई नेहरू सांस्कृतिक हॉल येथे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यात या अल्बमचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नामदार छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ.अमोल कोल्हे उपस्थित होते. अल्बमचे निर्माते मंगेश मोरे व गायक आनंद शिंदे यांचा या व्यासपीठावर शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या अल्बमची निर्मिती मंगेश मोरे यांच्या सप्तसूर म्युझिक कंपनीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सकाळी सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी अल्बमच्या पोस्टर चे प्रकाशन झाले. यावेळी अल्बम प्रकाशन सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे व संस्कृती विभाग प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, संगीतकार डॉ.आशिष मोरे, गीतकार प्रशांत मडपूवार आदी उपस्थित होते.
आमदार चेतन तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या अल्बमची निर्मिती मंगेश मोरे यांच्या सप्तसूर म्युझिक कंपनीच्या माध्यमातून करण्यात आली आहे, गायक आनंद शिंदे, संगीतकार डॉ.आशिष मोरे, गीतकार प्रशांत मडपूवार आहेत. या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले.