Sharad Pawar On Sunil Shelake : राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट झाल्याने खालच्या स्तरातील कार्यकर्ते देखील दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये दादा विरुद्ध साहेब असा संघर्ष होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अशात आता शरद पवार यांनी भर सभेतून दादा गटातील आमदाराला शरद पवार म्हणतात मला लक्षात असून द्या.. असा इशारा दिला आहे.
आज लोणावळ्यामध्ये शरद पवार गटांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला स्वत: शरद पवार उपस्थित होते. त्यांनी जाहीर सभेत एका आमदाराला इशारा देत सुनावल्याने सध्या राजकारण चांगलाच तापायला सुरुवात झाली आहे.
यावेळी सभेत बोलताना शरद पवार म्हणाले,”मला असं समजलं की, पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येतायत म्हणून धमकी दिली. मी त्यांना सांगू इच्छितो. सुनील शेळके तू आमदार कोणामुळं झाला ? तुझ्या सभेला कोण आलं होतं ? असं म्हणत शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीची आठवण शेळकेंना करून दिली. | Sharad Pawar On Sunil Shelake
तसेच पवार पुढे म्हणाले,” यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही असा थेट इशाराचा पवारांनी यावेळी दिला. | Sharad Pawar On Sunil Shelake
लोणावळा येथे ‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षातर्फे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित केले.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे प्रमुख श्री. माने, महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातील माजी मंत्री आणि आमचे… pic.twitter.com/yXmoUZKa9g
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 7, 2024
मोदींवर देखील केली टीका
राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी पक्ष असं मोदी म्हणाले होते. राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागात घोटाळा केला. असा आरोप मोदींनी केल्यावर मी म्हणालो, हिंमत असेल, तर चौकशी करा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ दे, मोदींनी चौकशी करावी. मात्र घडलं काय ? ज्यांच्यावर आरोप केले आज ते भाजपमध्ये आहेत असा घणाघात शरद पवार यांनी केला. | Sharad Pawar On Sunil Shelake
“संपूर्ण देश..” लालूंनी केलेल्या कुटुंबावरील टीकेला मोदींकडून देशाचा दाखला देत जोरदार प्रत्युत्तर
“30 लाख सरकारी नोकऱ्या, ट्रेनीला एक लाख रुपये..” राहुल गांधींनी गॅरंटी देत जाहीर केल्या 5 घोषणा