PM modi On Lalu yadav : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारच्या बेतीया येथे एका सभेत बोलताना राष्ट्रीय जनता दल पक्षाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यावर जोरदार टीका केली. लालू आणि त्यांचे कुटुंब बिहार या राज्याचे सगळ्यांत मोठे गुन्हेगार आहेत अशी तोफ त्यांनी डागली. एका दशकापेक्षा जास्त काळाच्या आपल्या राजवटीत त्यांनी बिहारमध्ये फक्त जंगलराज आणले असेही मोदी लालूंना लक्ष्य करताना म्हणाले.
राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेस आघाडीच्या दु:शासनामुळे बिहारच्या युवा पीढीला राज्याबाहेर पलायन करावे लागले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आल्यानंतरच राज्यात काही सुधारणा झाली आहे. | PM modi On Lalu yadav
जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, बाबासाहेब आंबेडकर, कर्पुरी ठाकुर यांच्यासारखी महान माणसे आज जीवंत असती तर आपल्या कुटुंबाला पुढे नेले नाही म्हणून त्यांच्यावरही या लोकांनी टीका केली असती. माझे कुटुंब नाही ही त्यांची माझ्याबद्दल तक्रार आहे. मात्र संपूर्ण देश हेच माझे कुटुंब आहे आणि आज सगळा देशही म्हणतो आहे की ते स्वत:ला मोदींच्या कुटुंबांचे सदस्य म्हणून पाहतात असं पंतप्रधानांनी लालूंना यावेळी सुनावलं. | PM modi On Lalu yadav
द्रमुकचे नेते ए. राजा यांच्या वादग्रस्त विधानाच्या अनुशंगाने मोदी म्हणाले की बिहार ऋषी वाल्मिकी यांची भूमी आहे. माता सीतेने येथेच आश्रय घेतला होता. लव आणि कुश यांचा जन्म येथेच झाला. मात्र त्याच प्रभू श्रीरामाचा इंडिया आघाडीकडून जो अपमान केला जातो आहे त्याकरता येथील जनता त्यांना कधीच माफ करणार नाही. आपली संस्कृती आणि परंपरेवर केल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या हल्ल्यांना कोण प्रोत्साहन देतो आहे हेही लोक पाहत आहेत. | PM modi On Lalu yadav