रत्नागिरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी वाढीव वीजबिलासंबंधी चर्चा केली असता राज्यपालांनी राज ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला होता. याच सल्ल्यावरून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शरद पवार यांच्याकडे हार मर्ज कि दवा है…असे कौतुकाने म्हटले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बहुतेक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची अडचण वाटत असेल. म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शरद पवार यांना भेटण्याचा मार्ग दाखवला असेल, अशी मिश्किल प्रतिक्रिया महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. ‘शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है’, असेही सत्तार यावेळी म्हणाले.
राज ठाकरे आणि राज्यपाल यांच्या भेटीवर मार्मिक भाष्य करत शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांनी राज ठाकरेंना डिवचले. “शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है. शरद पवार कुठल्याही गोष्टीवर मार्ग काढू शकतात. शरद पवार शेवटच्या टोकापर्यंतचे प्रश्न सोडवतात. राजकारणातल्या प्रदीर्घ अनुभवामुळे राज्यपालांनी राज यांना पवारांच्या भेटीचा सल्ला दिल्याचा दावा अब्दुल सत्तार यांनी केला.
“राज्यपालांशी वाढीव वीजबिला संदर्भात चर्चा केली. राज्यपालांशी बोलल्यानंतर ते बोलले पवार साहेबांशी बोलून घ्या, मुख्यमंत्र्यांशी बोलून घ्या, पवारांना मी फोन करणार आहे” असे राज ठाकरे यांनी राज्यपालांशी भेटीनंतर माध्यमांना सांगितले होते.